दहशतवादविरोधातील लढाईत शस्त्रास्त्रे पुरवू   

अमेरिकेची भारताला हमी

वॉशिंग्टन : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली असून या लढाईत अमेरिका भारताच्या पूर्णपणे पाठीशी आहे. भारताला लढाईसाठी लागणारी आवश्यक ती संसाधने पुरवली जातील,  असे, आश्वासन अमेरिकेचे प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांनी  दिले.
 
जॉन्सन म्हणाले, भारताला दहशतवादाविरुद्ध उभे राहावे लागेल. आम्ही त्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. ट्रम्प प्रशासन दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला ऊर्जा आणि संसाधनांसह मदत करेल,  भारतासोबतचे संबंध अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत यावर भर देऊन ते म्हणाले, आम्ही अमेरिकेत भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शक्य तितके सहकार्य करू आणि मला वाटते की हे सर्व या संबंधाचा एक भाग आहे. ट्रम्प प्रशासनाला या दोनही देशातील संबंधाचे महत्त्व स्पष्टपणे समजले असून दहशतवादी धोक्याचे जागतिक परिणामाची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध करत म्हटले की, दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहानुभूती आहे.

Related Articles